No menu items!
Saturday, May 17, 2025

पिकअप वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

Must read

पिकअप वाहनाच्या धडकेत वृद्ध दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. २३) दुपारी १२.३० सुमारास शिनोळी-सुरुते मार्गावर घडली. नागोजी धोंडीबा बाळेकुंद्री (वय ७०, रा. यळेबैल, ता. बेळगाव) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नागोजी आंबेवाडीतील (ता. चंदगड) पाहुण्यांच्या घरी मयताचे जेवण देण्यासाठी गेले होते. तिथून परत येत असताना सुरुतेजवळ बोलेरो पिकअप वाहनाची त्यांना धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बेळगाव जिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उतरीय तपासणी करुन रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!