No menu items!
Friday, May 16, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची बेळगावला धावती भेट

Must read

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख मंगेश चिवटे यांनी बेळगावला धावती भेट दिली .श्रीनगर येथे आतंकवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांचे प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्या उपचाराची विचारपूस करण्यासाठी व पुढील उपचार चांगल्या पद्धतीने नियोजित करण्यासाठी आज सकाळी बेळगाव विमानतळावरून दिल्ली येथे रवाना झाले . तेथून आज श्रीनगरला कनेक्टिंग विमानाने पोचणार आहेत . ह्या धावत्या भेटीदरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर व महाराष्ट्र एकीकरण समिती वैद्यकीय समन्वयक आनंद आपटेकर यांनी भेट घेऊन सीमा प्रश्नाविषयी व सीमा भागातल्या समस्यांवरती चर्चा करण्यात आली. मंगेश यांनी सर्व बाबींवरती लवकरात लवकर उपमुख्यमंत्री यांना माहिती देऊन बैठकीचे नियोजन करू असे सांगितले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!