श्री स्वामी समर्थ महाराज यांचे
स्वामीनातू दादा माऊली महाराज यांचे गुरुवारी बेळगावात आगमन झाले. विविध ठिकाणी स्वामी भक्तांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथम समर्थ नगर येथील एकदंत हॉल येथे त्यांनी भेट दिली. त्यावेळी भक्तगणांनी त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. स्वामीजींनी आपल्या सोबत समर्थ महाराजांची 100 वर्षांपूर्वीची एक मूर्ती आणली होती .त्याचे विधिवत अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बापट गल्ली, कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात त्यांचे आगमन झाले. त्यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने राजेंद्र गायकवाड, जितेंद्र राजपूत, लोकनाथ रजपूत यांनी त्यांचे स्वागत करून आशीर्वाद घेतले. यावेळी पूजन आणि आरती करण्यात आली. यावेळी सर्व कार्यक्रमांसाठी महांतेश हलगी, प्रतीक्षा हलगी, प्रशांत देवण, विनायक कोकितकर, सुरज गायकवाड , संतोष कणेरी, राहुल मुचंडी, अक्षय चौगुले आणि इतर भक्तगणांनी परिश्रम घेतले.