के एल इ इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांचा कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन बेळगावची पहिली महिला ॲम्बुलन्स ड्रायव्हर म्हणून शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात माधुरी जाधव यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत कित्येक रुग्णांना मदत केली आहे. त्याच बरोबर कोविड आणि नॉन कोविड मृतदेहांचे अंत्यसंस्कार ही त्यांनी केले आहेत. माधुरी जाधव यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला दिनानिमित्ताने रक्तदान शिबिर करून महिलांना मदत करण्याकरिता प्रोत्साहित केले आहे. ज्या महिलां वर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देणे, निराधारांना आधार मिळवून देणे हे कार्य त्या करत आहेत.
याकरिता त्यांना त्यांच्या मातोश्री श्रीमती. वासंती रामा पाटील यांचे व माधुरी जाधव फाउंडेशन टीमचे सहकार्य लाभत आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले स्वप्नील व्ही.टी Deputy Commandant MLIRC Bgm,डॉ. व्ही. एस. साधुनवर Chairman, Local Governing Body KLE Society Bgm, श्रीमती. स्वाती कुलकर्णी Choreographer, Writer, Singer & Theater Trainer Bgm,डॉ. व्ही. ए. कोतीवाले Registrar, KAHER, Bgm,डॉ. विवेक सावजी, Honorable Vice Chancellor, KAHER, bgm
डॉ .संजीव कुमार , Principal आदी उपस्थित होते.