पहाटे मॉर्निंग वॉक ला गेलेल्या जुने बेळगाव येथील 49 वर्षीय व्यक्तीचा वाहनाची धडक बसून जागीच मृत्यू झाला . आज रविवारी सकाळी सहा -सव्वा सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. प्रताप लक्ष्मण सालगुडे असे वाहनाच्या धडकेने मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे.
प्रताप लक्ष्मण सालगुडे हे रोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉक ला गेले होते. जुने बेळगाव नजीकच्या बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथे बळळारी नाल्याजवळ रस्त्याच्या कडेने चालत असतेवेळी नियंत्रण सुटलेल्या वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.