सुमारे 31वर्षांनंतर भरविल्या जात असलेल्या असू येथील लक्ष्मी यात्रे संदर्भात गावकऱ्याची नियोजन बैठक बुधवारी दुपारी 3 वा असू येथील नागनाथ मंदिरात घेण्यात आली.
8 मे रोजी लक्ष्मीच्या नावाने वार पाळून सायंकाळी नागनाथ देवस्थान येथे गोंधळ घालून रेडा सोडण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
13 मे रोजी सकाळी हळदीचा कार्यक्रम, सायंकाळी 4-39 मी. अक्षता रोपण करण्यात येणार आहे.
अक्षता रोहण असू कुंभारवाडा येथील लक्ष्मी मंदिरात होणार आहे.
या पूर्वी लक्ष्मी यात्रा 17 मे 1991 रोजी भरवण्यात आली होती .आता ही यात्रा सुमारे 31 वर्षांनी होणार आहे.