महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारी प्राथमिक मराठी शाळा बेळगुंदी येथे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या १लीच्या विद्यार्थ्यांना तसेच गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी युवा समितीचे कार्यकर्ते युवराज सुतार यांनी उपस्थिताना सदर उपक्रमाची माहिती देवून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा उद्देश पटवून दिला. उपस्थित शिक्षक श्री. सुहास माने सर यांनी युवा समितीच्या सिमाभागात चालू एकंदर कार्याचे कौतुक केले व आपल्या ध्येयपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी म.ए.युवा समिती बेळगुंदीतील यावेळी उपस्थित बेळगुंदी ग्रामपंचायत सदस्य श्री. राजू किनयेकर, रामा आमरोळकर, अजित शिंदे,शुभम कुनूरकर, प्रसाद सुतार,आदी सक्रीय कार्यकर्ते उपस्थित होते 🚩
मातृभाषेतून शिकणाऱ्यांना युवा समितीची मदत
Previous article६ मे रोजी प्रदर्शित होणार ‘भारत माझा देश आहे’