सीमा प्रश्नांमुळे सीमाभागात अडकलेल्या मराठी माणसाची व्यथा मांडण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे उदगीर महाराष्ट्र येथे दिनांक 22 ते 24 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या सीमा प्रश्नावरील परिसंवादासाठी सीमा भागातून शुभम शेळके यांची निवड करण्यात आली आहे.
दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत हा परिसंवाद होणार आहे. उदगीर तालुका हा कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा असून जवळच असलेल्या बिदर भालकी औराद मधील मराठी भाषिक सुद्धा महाराष्ट्रात सामील होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लढा देत आहेत.
त्यामुळे सीमेवर होणाऱ्या या साहित्य संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या संमेलनाला उपस्थित राहून परिसंवाद कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी शुभम शेळके यांच्यासह अन्य कार्यकर्ते ही रवाना होणार आहेत.