तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीची निवड अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.त्यामुळे 65 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात रस्ते सौरदिवे शुद्ध पाणीपुरवठा डिजिटल ग्रंथालय उद्यान सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आदींचा विकास केला जाणार आहे.
तसेच या अंतर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये भू जल आणि पर्यावरण संरक्षणावर भर दिला जाणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन व्ही एच यांनी दिली आहे
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 500 ग्रामपंचायती आणि 14 तालुक्यांचा समावेश आहे या सर्व तालुक्यांमधील 65 ग्रामपंचायतीची अमृत ग्रामपंचायत योजनेसाठी निवड झाली आहे. यामध्ये वृक्षारोपण तलाव खोदाई आणि इतर योजना राबविली जाणार आहे.
तसेच निवड झालेल्या ग्रामपंचायती मधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाणार आहे या अंतर्गत गावांमध्ये तलाव खुदाई प्रकल्प राबवले जाणार आहेत.
तसेच कृषी फलोत्पादन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण व शेतकऱ्यांसाठी इतर फायदेशीर योजना राबविल्या जाणार आहेत या बरोबरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत कुटुंबाला वर्षभरात 100 दिवस काम देणे बंधनकारक करणार आहेत.