नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आजादी का अमृत महोत्सव यांच्या वतीने खेलो इंडिया मास्टर असोसिएशन ॲथलेटिक्स स्पर्धेचे बेळगावच्या महिला अथलिटने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
नुकत्याच दिल्ली येथे 30 एप्रिल पासून ते 3 मे पर्यंत मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बेळगावच्या कन्येने गरुड झेप घेत तीन सुवर्णपदकाची गवसणी घातली आहे.
शीतल हिने 400 मीटर मध्ये सुवर्णपदक 800 मीटर मध्ये सुवर्णपदक 1500 मीटर मध्ये सुवर्णपदक तर 4×100 रिले मध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. सध्या शितल ही संजय घोडावत कॉलेज कोल्हापूर येथे अथलेटिक्स कोच म्हणून कार्यरत आहेत.