महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानकाळ्यांच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला. माळमारुती येथील दहापैकी |आठ गाळ्यांसाठी लिलावात बोली लागली.
लिलावात भाग घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने यावेळी बोलीही चांगली लागली. अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांसाठी गाळे राखीव ठेवण्यावरून वाद झाल्यानंतर १ व १० क्रमांकाचा गाळा राखव ठेवून त्यांचा लिलाव नंतर घेण्याचे ठरविण्यात आले.
मात्र, १ क्रमांकाच्या गाळ्यासाठी आधीच राखीव गटातील व्यक्तीने अनामत रक्कम भरल्यामुळे त्या गाळ्यासाठीची लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. त्या गाळ्यासाठी ५, ५०० रुपयांची सर्वाधिक बोली लागली. १० क्रमांकाच्या गाळ्यांचा लिलाव मात्र नंतर केला जाणार आहे.
१ क्रमांकाच्या गाळ्याचा लिलाव सोमवारी घेतला जाणार नाही, अशी भूमिका महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र, अनामत रक्कम भरलेल्यांनी लिलाव झालाच पाहिजे, अशी मागणी केली. त्यातून शाद्वीक चकमकही झाली. त्यामुळे लिलाव घेणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भाग पडले.
१ व १० क्रमांकाचा गाळा सोडून अन्य आठ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया झाली. मात्र, ६ क्रमांकाच्या गाळ्यांच्या लिलावात कोणी भागच घेतला नाही. उर्वरित गाळ्यांसाठी सध्याचे भाडेकरू व नवे इच्छुक यांनी बोली लावली. सध्याच्या भाडेकरूनांच ते दुकानगाळे हवे असल्यामुळे त्यांनी बोली वाढविली. इच्छुकांनीही त्यांच्या पुढे जात बोली लावण्यास सुरुवात केल्यामुळे सध्याचे भाडेकरू व इच्छुक यांच्यात वाद झाला. बोली वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप भाडेकरूंनी केला