पुढील दोन वर्षांमध्ये, दालमिया सिमेंट भारत लिमिटेड सिमेंट उत्पादनाला चालना देण्यासाठी त्यांच्या बेळगावच्या प्लांटमध्ये 200-300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे .बेळगाव मध्ये दालमिया सिमेंटने केलेल्या गुंतवणुकीमुळे सुमारे 1000 नोकऱ्या मिळणार आहेत .
भारतातील क्रमांक 4 वर असलेल्या सिमेंट निर्मात्याला त्याची राष्ट्रीय उत्पादन क्षमता 2024 पर्यंत 48.5 दशलक्ष टन आणि त्यानंतर 2031 पर्यंत 100 मेट्रिक टन पर्यंत वाढविण्यात मदत होणार आहे .
दालमिया भारत समुहाची प्रमुख कंपनी दालमिया सिमेंट भारत लिमिटेड (DCBL) कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्याच्या यदवड गावात ग्रीनफिल्ड सिमेंट प्लांट उभारत आहे. एकूण 2.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेसह 380 एकरांवर पसरलेला हा प्रकल्प आहे.तसेच दालमिया सुमारे 9 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा स्थापित करण्यासाठी विश्वास दाखविलेल्या रकमेपैकी काही खर्च करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
नवी दिल्लीस्थित दालमिया भारतची सिमेंट शाखा 2015 मध्ये त्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या ग्रीनफिल्ड सुविधेद्वारे कर्नाटकात दाखल झाली होती. याने आधीच राज्यभरात सुमारे 3,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.तर आता बेळगावात ही या नामांकित कंपनीमुळे जवळपास 1000 युवकांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.