बेळगाव : जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावसाठी कृती आराखडा तयार केला आहे .तसेच वेगवेगळ्या उपाय योजना ते राबविण्यासाठी पुढे सरसावले असून त्यांनी आता आपले कार्यालय ‘पेपरलेस ऑफिस’ करण्याचे आदेश दिला आहे.
त्यामुळे शहराचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘ई-ऑफिस’मध्ये रूपांतर होणार आहे.
राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्ला बेळगाव हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. लवकरच मेट्रोपॉलिटन पोलिसिंगच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे
तसेच शहराच्या सुशोभिकरणाचा निर्णय जिल्ह्याच्या शहरातूनच घेतला जाईल, असे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी सांगितले आहे .
तसेच सर्वत्र पिवळ्या लाल फुलांची झुळूक पाहायला मिळणार मिळणार आहे .शहरातील सर्व वेशीवर स्वागत कमानींच्या अनुषंगाने पिवळ्या व लाल फुलांची रोपे लावण्यात येणार असल्याचे सांगून डीसीएफ हर्षा भानू यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या योजनेला सहमती दर्शवली आहे.
येत्या पावसाळ्यात वनविभाग महानगर क्षेत्रासोबत इतर आवश्यक वृक्षांची लागवड करणार आहे.शहराची प्रशासकीय, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम शहराची भौतिक प्रतिमा स्मार्ट सिटीमध्ये बदलण्याचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी केला असून, शहरातील सर्व सुविधांचे सुशोभीकरण व सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना यापूर्वीच दिल्या आहेत.
वनविभाग, महानगर पालिका , बुडा, उद्यान विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संगनमताने नागरी सुशोभीकरण व सुव्यवस्थेचे काम करावे लागत असल्याची नोंद करण्यात आली आहे.