दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या रविवार दिनांक 12 जून रोजी शहराच्या दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. दक्षिण भागातील
उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहत आरपीडी परिसर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे असे कळविण्यात आले आहे.
तसेच 14 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शहराच्या उत्तर भागातील वीजपुरवठा देखील बंद केला जाणार आहे. किल्ला परिसर पाटील गल्ली भांदूर गल्ली आझाद नगर जुने गांधीनगर दीपक गल्ली भाजी मार्केट पाटील गांधीनगर दीपक गल्ली कुलकर्णी गल्ली फुलबाग गल्ली गल्ली रोड बसवन कुडची देवराज अर्स कॉलनी सांबरा रोड अमदनगर मध्यवर्ती बस स्थानक चव्हाट दरबार भडकल गल्ली माळी गल्ली भेंडीबाजार पांगुळ गल्ली यासह अन्य भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.