प्रादेशिक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी अमलान बिस्वास यांनी सोमवार दिनांक 13 जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 13 जून रोजी निवडणूक होत असल्याने त्यांनी
विना अनुदानित अनुदानित शाळा महाविद्यालय केंद्रीय आणि राज्यातील शासकीय निमशासकीय कार्यालय बँकांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी 13 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी बेळगाव विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.