मराठा एकता एक संघटन बेळगाव यांच्या वतीने दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
येथील राकस्कोप रोडवरील दुर्गामाता कार्यालय बेनकनहळ्ळी जवळ रविवार दिनांक 12 जून रोजी आयोजित करण्यात आला असून दुपारी एक वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न मराठा एकता एक संघटन बेळगावचे अध्यक्ष नारायण झंगरुचे असणार असून प्रमुख वक्ते म्हणून खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व कॉलेजचे प्राध्यापक अरविंद पाटील उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता विलास पवार यांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मराठा एकता एक संघटन बेळगाव या संघटनेकडून करण्यात आले आहे.