बेळगाव पणजी महामार्गावर खानापूर शहराची जागृत देवता श्री मऱ्यामा देवीची वार्षिक यात्रा दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे.
14 जून पासून या यात्रेला प्रारंभ होणार असून 15 जून रोजी यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 14 जून रोजी वटपौर्णिमा असल्याने देवीला गोड नैवेद्य व ओटी भरणे असे कार्यक्रम होणार आहेत तसेच दिनांक 15 जून रोजी दिवसभर नवसफेड करण्यात येणार आहे.
त्यावेळी सकाळी साडेदहा वाजता पंचकमिटी वतनदार यांच्या उपस्थितीत देवीसमोर गार्हाणं करण्यात येणार आहे त्यानंतर दिवसभर नवसफेडी चा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर रात्री साडेआठ वाजता या उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
सदर यात्रा दोन वर्षानंतर आयोजित करण्यात आल्याने या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील सज्ज झाल्या सोनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.