No menu items!
Sunday, December 22, 2024

गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

Must read

दुर्गामाता मंगल कार्यालय राकस्कोप रोड येथे 12 जून रोजी मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने समस्त मराठी माध्यमिक विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

या कार्यक्रमाला आमंत्रित समस्त विद्यार्थी पालक मुख्याध्यापक यांचे स्वागत आदराथित्य करण्यात केले.त्यानंतर मान्यवरांचेही स्वागत आदराथित्य करत मान्यवर व्यासपीठावर स्थानापन झाले .त्यानंतर उपस्थित सर्वांना भगवी शाल पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले

प्रारंभी विध्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात करत दिपप्रज्वलन करून फोटो पूजन केले.त्यानंतर मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.

याप्रसंगी संघटनेचे ध्येयधोरण कर्तृत्व सांगत प्रास्ताविक शैक्षणिक संघटन अध्यक्ष नाथाजी मरगाळे यांनी केले.त्यानंतर संघटनेचे प्रधानकार्यदर्शी अमोल जाधव यांनी संघटनेच्या संकल्पनिय नेतृत्वाचे योगदान त्याचे फलित सांगितले.
याप्रसंगी विलास पवार यांनी मराठा समाज संघटीत झाला पाहिजे.यासाठीच या संघटनेचा जन्म झाला आहे.या संघटनेला आपण जपलं पाहिजे,मोठं केलं पाहिजे,कारण या संघटनेच्या माध्यमातून संघटित समाजाच्या कुवतीने हरएक क्षेत्रातील हक्क संपादन करायचा आहे असे सांगितले.
त्यानंतर प्रमुख वक्ते अरविंद पाटील यांनी मराठा समाजाने शिक्षण का आणि कसे शिकायचे यासाठी एक विध्यार्थिनीची हृदयस्पर्शी शिकवण सांगत मुलांना प्रोत्साहित केले.

यावेळी संघटन अध्यक्ष नारायण झंगरुचे यांनी संपूर्ण संघटनेच्या वतीने उपस्थित सर्वं विद्यार्थी पालक मुख्याध्यापक मान्यवरांचे धन्यवाद मानत कृतज्ञतेने सांगितले की आपल्या संघटनेचे प्रथम चरण हे सामाजिक एकता आहे.तर दुसरे चरण सामाजिक शिक्षितता आहे.कारण उच्च शिक्षण घेऊन उच्च स्थरी पोहोचणं आज काळाची गरज आहे.त्यासाठी आपले संघटन आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या समाजातील संपूर्ण सामाजिक संस्थानिक शासकीय हक्कांचा वाटा एकवटून विध्यार्थांच्या पुढील शिक्षित जबाबदार कर्तृत्वाशी कटीबद्ध राहील असे सांगून मार्गदर्शन केले

त्यानंतर विध्यार्थ्यांचा पालकांसह मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी संघटन अध्यक्ष नारायण झंगरुचे,अमोल जाधव,नाथाजी मरगाळे,विलास पवार,अरविंद पाटील,राजू पाटील,नितीन राजगोळकर,मोनापा भास्कळ,सुभाष पाटील,मोनापा शहापूरकर,परशराम खांडेकर,राजकिरण नाईक,रोहित चोपडे,संगिता देसाई,शारदा अमरोळकर,मधुकर जाधव,विजय कून्नूरकर,हणमंत गुरव,चंद्रकांत पाटील,शिवाजी जाधव,सागर झंगरुचे,व्यंकटेश देवगेकर,रोहित पाटील,मोहन पाटील,परशराम कणबरकर,मनोहर पाटील,अरुण गुरव,उमाजी कडोलकर,अनिल गोजेकर,अजित मोरे आदिंसह सर्वं पदाधिकारी शेकडो कार्यकारी सदस्य समस्त विद्यार्थी पालक मुख्याध्यापक मान्यवरांच्या उपस्थित अगदी उत्साहाने गौरव सोहळा संपन्न झाला.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!