No menu items!
Monday, December 23, 2024

या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध जातीची रोपे

Must read

अल्पभूधारक शेतकऱ्यांना फलोत्पादन खात्याच्या वतीने विविध जातींच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेअंतर्गत ही महत्त्वपूर्ण योजना राबविली जात असून शेतकऱ्यांना याद्वारे फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांचे बारमाही उत्पादन वाढविण्यासाठी फलोत्पादन खाते प्रयत्नशील आहे. बागायत क्षेत्र वाढावे यासाठी बागायत खात्यामार्फत दरवर्षी विविध फळ रोपे दिली जातात त्यानुसार यंदाही अल्पभूधारक शेतकऱ्यांना या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. फळ बागायत शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याकरिता विविध फळ रोपे दिली जाणार आहेत यामध्ये चिंच आंबा मका जांभूळ लिंबू काजू नारळ डाळिंब अंजीर पेरू शेवगा द्राक्ष सीताफळ कडीपत्ता आवळा गुलाब फणस मोगरा सूर्यफूल यासह अनेक झाडांची रोपे देण्यात येणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी रयत संपर्क केंद्र किंवा फलोत्पादन खाते किंवा तालुका उत्पादन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!