निवृत्त कॅप्टन चांगाप्पा पाटील करणार मार्गदर्शन
सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उद्या एक दिवसीय मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात युवक आणि युवती यांना देखील मार्गदर्शन करण्यात येणार असून सदर शिबिर उद्या मंगळवार दिनांक 21 रोजी सकाळी दहा वाजता खानापूर येथील शिवस्मारकात पार पडणार आहे.
सदर शिबिर क्षत्रिय मराठा परिषद व निवृत्त सैनिक संघटना तीनही दर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली असून या शिबिरात निवृत्त कॅप्टन चांगप्पा पाटील निवृत्त मेजर पांडुरंग पाटील निवृत्त सुभेदार हनुमंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शिबिराचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.