बेळगाव :
कुद्रेमनी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील यांना अवमानकारकरित्या अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली .एका महिलेने अर्वाच्च शिवीगाळ केलेली असताना या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. सदर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव कारणीभूत ठरत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे कुद्रेमनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले आहे.
संबंधित महिलेने विनायक पाटील या कुद्रेमनी ग्रामपंचायत उपाध्यक्षांना अर्वाच्च शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. यानंतर माझे काय वाकडे करून घेतले अशा शब्दात पुन्हा संबंधित महिलेने अवमान केला असून विशेष समाजाला गुन्हे दाखल करून घेण्याच्या बाबतीत दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप करून मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप बेळगाव ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम,मराठा समाज नेते नारायण झगरूचे,स्वतः विनायक पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष रेणुका नाईक, सदस्य संजय पाटील, अरुण देवण, शिवाजी मुरकुटे, लता शिवनगेकर,विमल साखरे, आरती लोहार, मल्लाव्वा कांबळे आदी उपस्थित होते.