प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठीविशेष बस सुरू केली जाणार आहे. हुबळी रेल्वेस्थानकातून सायंकाळी ६ आणि ६.३० वाजता दोन बस बेळगावकडे धावणार आहेत. तर बेळगाव रेल्वेस्थानकातून सकाळी ५ आणि ५.३० वाजता दोन बस हुबळीकडे धावणार आहेत.बेळगाव- सुलधाळ रेल्वे दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव म्हैसूर ही विश्वमानव एक्स्प्रेस धारवाडपर्यंत धावणार आहे. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हुबळी रेल्वेस्थानक ते बेळगाव IIIT रेल्वेस्थानक अशी विशेष बससेवा सुरू केली जाणार आहे.
२२ ते २८ जून या कालावधीत ही बससेवा धावणार आहे. रेल्वेची धावगती वाढविण्यासाठी दुपदरीकरणाचे काम सुरू आहे दरम्यान बेळगाव- सुलधाळ दरम्यान देखील दुपदरीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे. शिवाय कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी बेळगाव म्हैसूर ही एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावणार नाही.
प्रवाशांनी देखील बससेवा सुरू करा, अशी मागणी लावून धरली होती. या मागणीनुसार या मार्गावर बससेवा सुरू केली आहे. कोरोनानंतर एक्स्प्रेस आणि पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दरम्यान अनेक रेल्वे पूर्ववतपणे धावत आहेत. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. शिवाय रेल्वे दुपदरीकरणाची कामेदेखील सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेसेवेत अडचणीत येत आहेत.