बैलहोंगल तालुक्यात कार्यरत असलेल्या अप्पर सरकारी वकिलांचा कालावधी पूर्ण झाला असून रिक्त असणाऱ्या जागेवर नवीन उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
वकील व्यवसायाचा ७ वर्षे अनुभव असणाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक वकिलांनी नाव, शिक्षण, जात, वय, अनुभव आदी वैयक्तिक माहिती २२ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन विभाग येथे द्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे