महाराष्ट्र स्टेट गव्हमेंट पेन्शनर्स असोसिएशन बेळगाव यांची वार्षिक सभा रविवार दि. ३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक, जत्तीमठ येथे आयोजित करण्यात आली आहे.
सभेस प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त शिक्षण उपसंचालक व पेन्शन गाईड या पुस्तकाचे लेखक अरविंद दीक्षित उपस्थित राहणार आहेत.
दीक्षित हे महाराष्ट्रातून निवृत्त झालेल्या सभासदांच्या पेन्शनविषयक शंका व अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
संघटनेच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सचिव शशिकांत साळुंखे यांनी केले आहे