गेल्या आठवड्यात सासू आणि मुलांवर चाकू हल्ला करणाऱ्या दीपक वाके यांचा मृत्यू झाल्यामुळे वाके कुटूंबिय उघड्यावर पडले आहे. त्यामुळे या कुटुंबीयांना मदत करण्याकरिता जायंटस सखीने पुढाकार घेऊन त्यांना मदत देऊ केली आहे.
यावेळी कंग्राळी येथे झालेल्या झटापटीत दिपक वाके यांचा मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी मोलमजुरी करून आपल्या मुलांचे पालन पोषण करीत आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या खचलेल्या दीपा वाके यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देत दोन महिना पुरेल इतके आहार धान्य देण्यात आले आहे.
तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणा करीता शैक्षणिक साहित्यही देऊ करून जायंट्स सखीने त्यांना मदतीचा हात दिला आहे. यावेळी जायंट्सच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे माजी अध्यक्ष नीता पाटील संस्थापक अध्यक्ष ज्योती अनगोळकर उपाध्यक्ष विद्या सरनोबत अपर्णा पाटील सचिव सुलक्षणा शिरोळकर शितल नेसरीकर अर्चना पाटील वृषाली मोरे अर्चना कंग्राळकर यांच्यासह अन्य सदस्यांच्या आर्थिक सहकार्यातून वाके कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे