जाधवनगर येथील 26 कर्नाटका एनसीसी बटालियनतर्फे एनसीसी छात्रांसाठी आयोजित वाहतूक कायदा व नियम जनजागृती कार्यक्रम आज बुधवारी पार पडला.
सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक उपस्थित होते. नाईक यांनी एनसीसी छात्रांना वाहतुकीबद्दल असणारे कायदे, नो-पार्किंग, ड्रिंक अँड ड्राइव्ह, वेगावर नियंत्रण न ठेवता वाहने चालविणे, ट्रिपल सीट, हेल्मेट सक्ती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर नियम व रहदारी कायदा याची माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमास बहुसंख्य एनसीसी छात्रांसह कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव खजुरिया, एडम ऑफिसर कर्नल एस. दर्शन, कॅम्प कमांडंट कर्नल बी.एस. चरक आणि सुभेदार मेजर निलेश देसाई उपस्थित होते.