बेळगाव शहरासह उपनगरात सुध्दा पावसाळ्यात डासांची झपाट्याने वाढ झाल्याने सगळीकडे डेंग्यु आणि चिकणगुणिया झालेले अनेक रुग्ण पहावयास मिळत आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी
जायंट्स सखीच्या वतीने ज्योतीनगर आणि क्रांतीनगर परिसरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दरवर्षी जायंट्स सखीच्या वतीने पावसाळ्याच्या सुरुवातीला “मोफत डेंग्यू व चिकनगूनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर” आयोजित करण्यात येते.
यावेळी हा उपक्रम ज्योतीनगर आणि क्रांतीनगर भागात पार पडला. रविवारी या ठिकाणी चिकनगुनिया व डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण आयोजित करण्यात आले होते. या भागातील शेकडो नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
लसीकरणाचा शुभारंभ बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्षा प्रेमा हिरोजी यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य डॉ यल्लाप्पा पाटील,मौनेश्वर गरग,कल्लाप्पा पाटील रमेश हिरोजी उपस्थित होते.
याप्रसंगी जायंट्स सखीच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे यांनी उपस्थित पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांनी लसीकरण शिबिराचा उद्देश सांगितला.
उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना औषधाचे थेंब घालण्यात आले.