प्रगतशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 15 जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी राष्ट्रध्वज खादीच्याऐवजी पाँलिस्टरचा
बनविण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
गांधीवादी नेते अशोकभाई देशपांडे हे यावेळी आपले विचार मांडणार आहेत. गिरीश काँप्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.