येथील शेट्टी गल्लीच्या कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तसेच ओला आणि सुका कचरा एकत्रितपणे टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांनी येथील कचरा उचलण्याकडे कानाडोळा केला असते सदर परिस्थिती उद्भवली आहे.
रोजच येथील कोपऱ्यावर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला पाहायला मिळतो. तसेच येथून इजा करणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरूनच जावे लागते.
तसेच गाई म्हशी आणि बकरी देखील या साठलेल्या कचऱ्यात अन्न शोधण्याकरिता कचरा इतरत्र विसकटत असतात. तसेच येथील कचरा अर्धा रस्त्यावर आलेला निदर्शनास येतो.
नेहमी वर्दळ असलेल्या या ठिकाणी कचऱ्याची उचल करण्यात येत नसल्याने नागरिक आणि येथील व्यावसायिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे सकाळीच महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांनी येथील कचऱ्याची उचल करावी आणि नागरिकांना या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी करत आहेत.