बेळगाव : म. ए. युवा समितीच्यावतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यावर्षी २०० हून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असून शिक्षणप्रेमी, मराठी भाषाप्रेमी व युवा समितीच्या हितचिंतकांनी उपक्रमाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी टिळकवाडीतील कावळे संकुल येथील युवा समितीच्या कार्यालयात अथवा अंकुश केसरकर (९०३६३७८११५), श्रीकांत कदम (९६११७५६५२९) या क्रमांकाशी संपर्क साधावा
युवा समितीतर्फे सहकार्याचे आवाहन
By Akshata Naik
Must read
Previous articleयेथील कचऱ्याची उचल करणार कोण?