के एस आर टी सी चा डीसींना बैलूरच्या विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदनात त्यांनी बैलूर भागात बस सेवा सुरळीत करावी अशी मागणी केली. तसेच बस नियमित नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्याचे गाऱ्हाणे विद्यार्थ्यांनी मांडले.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे रमाकांत कोंडुस्कर यांनी विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांचे भवितव्य आपल्याला उज्वल करायचे असेल तर त्यांना शिक्षणाची नितांत गरज आहे मात्र बैलूर मध्ये बस सेवेचा अभाव असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या भागात विद्यार्थी ची संख्या जास्त असल्याने तसेच बस उपलब्ध नसल्याने एकाच बसमध्ये सर्व विद्यार्थी जात आहेत त्यामुळे काहींना लोंबकळण्याची वेळ येत असून एखादा अनर्थ घडण्यापूर्वीच के एस आर टी सी च्या डीसीनी लवकरात लवकर बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती यावेळी केली.
बैलूर गावातील विद्यार्थिनींना अनेक वेळा बस चालकाने बस मध्ये गर्दी होत असल्याकारणाने दुसऱ्या गावी उतरले आहे तेथून अनेक विद्यार्थी पायपीट करत आपल्या घरी पोचले आहेत. बस नियमित नसल्याने विद्यार्थिनींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे बैलूर भागात बस सेवा सुरळीत करावी अशी मागणी यावेळी बैलूर भागातील विद्यार्थ्यांनी आंदोलन करून निवेदनाद्वारे के एस आर टी च्या डीसीन कडे केली.