कर्नाटक मराठा कम्युनिटीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य उद्घाटन आणि लोगो लॉन्चिंग सोहळा लवकरच पार पडणार आहेत .तसेच त्याचे उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई आणि श्री श्री मंजुनाथ भारती स्वामी जी, वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी आणि कर्नाटक मराठा समाजाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्यामुळे विकास महामंडळ आणि इतर सर्व आमदार आणि खासदार यांनी उद्या मंगळवार 19/07/2022 रोजी सकाळी 11 वाजता त्रिपुरा वासिनी पॅलेस ग्राउंड बेंगळुरू येथे उद्घाटन समारंभ उपस्थित राहावे असे आवाहन किरण जाधव यांनी माहिती देण्याप्रसंगी केले.
यावेळी ते म्हणाले मराठा समाजातील एकजूट दाखवण्यासाठी मी सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती करतो, मराठा समाजाचा मुख्य हेतू आगामी काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या कलाकारांना 2 ब श्रेणीमध्ये समाविष्ट करणे हा आहे. त्यामुळे एकजूट दाखविण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले