वैद्यकीय शिक्षण अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाकरीता त्यांना लॅपटॉप हवे असल्यास त्यांनी महानगरपालिकेला अर्ज करावे असे कळविण्यात आले आहे.
महापालिकेच्या राखीव अनुदानातून मागासवर्गीयांसाठी विविध योजना राबविण्यात आले आहेत. याच योजनेमधून विद्यार्थ्यांना साडेबारा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार त्यांना लॅपटॉप वितरित करण्यात येणार असून महानगरपालिकेने लॅपटॉप खरेदी देखील केली आहे. तसेच जवळपास 25 लाभार्थ्यांना या लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे
त्यामुळे मागासवर्गीय समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे बीए शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.