रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. याबाबत अनेकवेळा निवेदन देऊन देखील या समस्येकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आज खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज खानापूर जांबोटी क्रॉस करंबळ रुमेवाडी क्रॉसनजीक रास्ता रोको करून रस्त्यात वृक्षारोपण करून आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रस्ता दुरुस्त करून देण्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले होते. तसेच आपल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास रस्त्यात वृक्षारोपण करून आंदोलन करू तसेच रास्ता रोको करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.
त्यानुसार आपल्या मागणीची पूर्तता न झाल्याने सर्वांनी मिळून रास्ता रोको केला आणि वृक्षारोपण करून प्रशासनाचा तीव्र निषेध केला. यावेळी सर्वसामान्यांच्या समस्येकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला
यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी दोन तास बेळगाव पणजी महामार्ग रोखून धरला होता याप्रसंगी सदानंद पाटील प्रकाश चव्हाण विशाल पाटील सदानंद मासेकर माऱ्याप्पा पाटील नारायण कापोलकर बाळासाहेब शेलार मारुती गुरव विलास बेळगावकर आप्पासाहेब दळवी मुरलीधर पाटील दिगंबर पाटील यांच्यासह समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते