सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता पोलीस अधिकाऱ्यांनी गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे .आज येथील मार्केट एसीपी कार्यालयामध्ये ही बैठक पार सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे.
या बैठकीत यंदाचा गणेशोत्सव कोणत्या पद्धतीने साजरा करायचा .तसेच कोणते नियम अटी महामंडळांना असतील याबद्दल चर्चा केली जाणार आहे.
तसेच या बैठकीत पोलीस अधिकारी गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत .तरी सर्वांनी वेळेवर निश्चित स्थळी जमावे असे आवाहन करण्यात आले आहे.