मराठा समाज विकास प्राधिकरण कार्यालयाचे 19 जुलै 2022 मंगळवारी बेंगळूरात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई जी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच श्री एमजी मुळे हे पहिले अध्यक्ष म्हणून घोषित केले जाणार आहेत. त्यामुळे बेळगाव येथून हजारो कार्यकर्ते बेंगलोर येथे आपली उपस्थिती दर्शविण्यात करिता गेले आहेत.
भारतीय जनता पार्टी बेळगांव ग्रामीणचे माजी अध्यक्ष तसेच पश्चिम भागातील मराठा नेते विनय विलास कदम यांच्या नेतृत्वाखाली बेळगांव येथून आज होणाऱ्या प्राधिकरण कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शेकडो कार्यकर्ते व भागातील विविध संघटना यांचे पदाधिकारी रेल्वेच्या प्रवासाने बेगंळुरला निघाले आहेत.
मराठा एकता एक संघटन चे अध्यक्ष नारायणराव झंगरुचे,श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी संघटन बेळगाव चे अध्यक्ष श्री परशराम तुप्पट,कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघ चे संजय पाटील,बीजेपी युवा नेते उमेश चौगुले,अमोल जाधव, रवळनाथ चौगुले, मारुती चौगुले,लक्ष्मण चौगुले, उमेश शिंदे,सुनील मंडोळकर,महादेव डोणकारी, सुनिल यळगुकर,सुनील कोळी व सूरज पाटील आदी कार्यकर्ते बेंगलोरला निघाले आहेत.