सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सांबरा येथे विश्व डास दिवस साजरा करण्यात आला. डासामुळे डेंगू मलेरिया रोगांचा प्रसार होतो .असे यासाठी उपस्थित असलेले आरोग्य केंद्राचे डॉक्टर राठोड यांनी सांगितले .
तसेच गावातील आशा वर्कर सुमित्रा तिमापुरमठ अर्चना पाटील नीता धर्मोजी रूपा कलखाबंकर गौरम्मा देसाई व शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती ए ए पाटील शिक्षक ए बी पागाद व्ही एस कंग्राळकर श्रीमती आर बी लोहार व अतिथी शिक्षक सुप्रीता नेसरकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी सर्वांनी मिळून सामूहिकपणे प्रतिज्ञा केली यावेळी मुलांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे सांगितले