श्रावणातील चौथ्या रविवार निमित्त येथील बेळगाव नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग मंदिरात मनी मार्तंड जय मल्हार साकारण्यात आला होता.
दरवर्षी येथील मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त ज्योतिर्लिंग साकारण्यात येतात. तर यावर्षी रविवारी देखील मंदिरात मनी मार्तंड येळकोट जय मल्हार साकारण्यात आला होता
यावेळी सकाळी आठ वाजता जोतिबा देवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मनी मार्तंड जय मल्हार देवाची प्रतिकृती साकारण्यात आली यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
त्यानंतर दुपारी बारा वाजता आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.