भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नुकत्याच जारी केलेल्या मासिक हवाई वाहतूक अहवालात असा निष्कर्ष काढला आहे की, जुलैमध्ये बेळगाव विमानतळावरील प्रवासी वाहतूक गेल्या महिन्याच्या तुलनेत 29 टक्क्यांनी कमी झाली आहे.
बेळगाव विमानतळावर एकूण 25,943 प्रवाशांची ये-जा होती ती जूनमधील 34,727 च्या तुलनेत 8784 कमी झाली आहे.जूनच्या तुलनेत संचालित फ्लाइट्सची संख्या 12 टक्क्यांनी कमी झाल्याचेही डेटा प्रसिद्द केला आहे . जुलैमध्ये एकूण ४९४ उड्डाणे भरण्यात आली होती .परंतु, मासिक मालवाहतूक 29% ने वाढली आहे.
AAI डेटानुसार, जुलै महिन्यात मालवाहतूक 8 मेट्रिक टन होती तर जूनमध्ये 6 मेट्रिक टन अशी झाली आहे
विमान वाहतूक नियामक DGCA ने 18 ऑगस्ट रोजी सांगितले की, भारतातील देशांतर्गत हवाई वाहतूक जुलैमध्ये 7.6 टक्क्यांनी घसरून 97 लाख फ्लायर्सवर आली आहे, जी मागील महिन्यात 1.05 कोटी होती.
सदर घसरण पावसाळ्याच्या हंगामाला दिले निर्माण झाली असून भारतातील विमान वाहतूक क्षेत्रासाठी हा सहसा दुबळा कालावधी ठरला आहे .तसेच पावसाळ्यात ही परिस्थिती नेहमी उद्भवत असल्याचे देखील सांगितले आहे