हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या कुप्पटगीरी व त्यांच्या पत्नी कै. नर्मदा होसुरकर याचं माहेर असलेल्या निडगल येथे खानापूर तालुका म.ए.समितीच्या वतीने १ नोव्हेंबर काळ्यादिनाची जागृती मोहीम राबविण्यात आली.खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येणाऱ्या एक नोव्हेंबर काळा दिनाची जागृती करण्यासाठी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक गावामध्ये पत्रके वाटून जागृती केली जात आहे आज सीमा प्रश्नासाठी बलिदान दिलेले हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या गावी तसेच त्यांच्या पत्नी श्रीमती होसुरकर यांचं माहेर असलेलं निडगल गावात खानापूर समितीच्या नेते मंडळीने कोपरा सभा घेऊन गावातील नागरिकांना एक नोव्हेंबर काळा दिन कडकडीत हरताळ पाळून केंद्र शासनाचा निषेध नोंदवावा व महाराष्ट्रात सामील होण्याची ही धगधगती मशाल कायम तेवत ठेवावी असे आवाहन करण्यात आले कुप्पूटगिरी गावातील ज्येष्ठ मंडळीची भेट घेऊन सीमा प्रश्नाबद्दल समितीच्या नेत्यांनी चर्चा केली व येणाऱ्या एक नोव्हेंबर काळा दिवस कडकडीत पाळण्याचे आवाहन करून सीमा प्रश्नाचा रस्त्यावरचा लढा तालुक्यामध्ये तीव्र करावा असे विचार कुप्पूटगिरीतील ज्येष्ठ नागरिकांनी समितीच्या नेत्या पुढे व्यक्त केली.यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी एक नोव्हेंबर काळा दिन कडकडीत पाळण्याचे आवाहन करताना खानापूर येथील लक्ष्मी मंदिर येथे सकाळी 11 ते दुपारी दोन पर्यंत लाक्षणिक उपोषण व सभेचे आयोजन केले आहे यात मोठ्या संख्येने मराठी भाषिकाने भाग घ्यावा, असे सांगून यापुढे समितीचा सीमाप्रश्न विषयी असलेला सीमा लढा मोठ्या जोमाने लढला जाईल. यावेळी कुप्पूटगिरीचे ज्योतिबा पाटील, ईश्वर पाटील, व्यंकट पाटील, तुकाराम पाटील, नारायण पाटील, नितीन गुंजीकर, केदारी पाटील, विनोद पाटील, लखन पाटील, प्रवीण पाटील, दर्शन पाटील, मल्लाप्पा पाटील, परशुराम पाटील, पांडुरंग पाटील, जानबा पाटील, प्रकाश पाटील, तसेच निडगल गावांमधील जोतिबा चौगुले, पांडुरंग कदम, पांडू कदम, शिवाजी कदम, हरीश मादार, महेश कदम, वामन कदम, बबन कदम, पिराजी कदम, सुशील कदम, सुधीर कदम, दिनेश सुतार, साईनाथ कदम, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे समितीचे देवाप्पांना गुरव, माजी सभापती सुरेशराव देसाई, गोपाळ पाटील, सूर्याजी पाटील, बळीराम पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, गणपती पाटील, आदी उपस्थित होते.