धर्मप्रेमींच्या सहभागाने हिंदु राष्ट्र स्थापनेचा जयघोष !
बेळगावी– धर्मप्रेमींच्या उत्साहपूर्ण सहभागाने ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’ आदी स्फूर्तीदायक जयघोषात बेळगावी येथे एकदिवशिय प्रांतीय हिंदु अधिवेशनाला 08 जानेवारी प्रारंभ झाला. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हे एकदिवशीय अधिवेशन छत्रेवाडा, अनसूरकर गल्ली, बेळगावी येथे पार पडत आहे. बेळगावी जिल्हातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.
सकाळी 11.00 वाजता शंखनादाने अधिवेशनाला प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. यानंतर पुरोहित श्री. वासुदेव छत्रे यांच्या चैतन्यपूर्ण वाणीत वेदपठण केले. त्यानंतर मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले होते.
सकाळच्या सत्रामध्ये वक्त्याने मांडलेल विचार
हिंदुनी हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी संविधानाचा अभ्यास सर्वांनी करावा !
ज्येष्ठ अधिवक्ता श्री. अशोक पोतदार
आजची हिंदूची सध्यस्थिती पाहता, हिंदुवर होणारे आघात रोखायचे असतील तर हिंदु संघटीत होणे खूप आवश्यक आहे. यासाठी असे (हिंदु राष्ट्र अधिवेशन सारखे) हिंदूचे कार्यक्रम गलोगल्ली, तालुक्यात, जिल्हात, सतत झाले पाहिजे. हिंदूंना जागृत करून संघटित केले पाहिजे. यासाठी हिंदू जनजागृती समितीचे हिंदुत्वाचे कार्य हे सर्वांना स्फूर्ती आणि प्रेरणा देणारे आहे.
हिंदुनी हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी संविधानाचा अभ्यास सर्वांनी करावा असे आव्हानही त्यांनी केले.
‘हिंदु राष्ट्र’ हे सर्व समस्यांवर एकमात्र उपाय !
चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.
हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे हे स्पष्ट करताना. ते म्हणाले आज हिंदू बहुसंख्यक भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, थूक जिहाद’ ची भयंकर षड्यंत्रानी ग्रासला आहे.
हिंदु नेत्यांच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. काश्मीर नंतर गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, देहली येथील हिंदु समाजाला स्वतःच्या घरावर ‘मकान बिकाऊ’च्या पाट्या (बोर्ड) लावाव्या लागत आहेत.आज देशातील ९ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक बनले आहेत.
हलाल इकॉनॉमी एक आर्थिक जिहाद – श्री. हृषिकेश गुर्जर, हिंदु जनागृती समिती समनवयक बेळगावी .
हलाल जिहाद या विषयावर बोलतांना ते म्हणाले,
देशात अनधिकृतपणे धर्माच्या आधारावर हलाल लोगो असलेले प्रमाणपत्र जनसामान्य वापरत असलेल्या उत्पादनांवर छापून सहस्रो कोटी रूपयेसंग्रहीत करून धर्मांध संघटनात्याचा देशविरोधी कारवायांसाठी उपयोग करत आहेत.केंद्र शासनाची FSSAI ही प्रमाणपत्र देणारी संस्था असून देखील धर्माच्या आधारावर ‘हलाल प्रमाणपत्र’देणे हे संविधानाच्या विरोधी आहे. ते त्वरीत रद्द करावे. हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैसा देशद्रोही कारवायांसाठी वापरला जात आहे.