ऑपरेशन मदत आणि छत्रपती शंभुराजे परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने कणकुंबी परिसरातील अतिदुर्गम भागात वसलेल्या सडा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी या स्वच्छता मोहिमेत एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी देखील उपस्थिती लावली.
यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सडा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत येथील किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी या स्वच्छता मोहीम कार्यक्रमाला कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून अनेक स्वयंसेवक आले होते.त्यांनी देखील यामध्ये सहभाग दर्शवून स्वच्छता केली.
यावेळी स्वच्छता मोहीम झाल्यानंतर रात्री संघटनेच्या मार्फत वेगवेगळ्या गडांची केलेले स्वच्छता व दुर्ग संवर्धनाच्या कार्याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्याना प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आली.त्यानंतर या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला.