कट्टर आणि स्वाभिमानी मराठी नागरिकांमध्ये उत्तर मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार वकील अमर यळळूरकर यांना पाठिंबा देत आहेत.
तसेच शहराच्या विविध भागात त्यांनी प्रचार केला असता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे काल त्यांनी गवळी गल्ली गोंधळी गल्ली नार्वेकर गल्ली कंग्राळ गल्ली या प्रमुख गल्ल्यांमधून प्रचार फेरी काढली यावेळी त्यांना नागरिकांचा उस्फूर्त पाठिंबा मिळाला.
नागरिकांनी समितीच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आणि बेळगाव मध्ये समितीचा झेंडा फडकू असा विश्वास अमर येळळूरकर यांना दिला. यावेळी गल्लोगल्ली यळळुकर यांची ओवाळणी करून त्यांचे स्वागत करण्यात येत होते तसेच काही युवक संघटनांकडून फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येत होती आणि त्यांचे स्वागत करण्यात येत होते.
बऱ्याच गल्ल्यांमध्ये त्यांचे नाम फलकावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र देखील दिसून आले.तसेच त्यांनी मध्यवर्ती भागामध्ये विविध ठिकाणी प्रचार फेरी काढून आपला झंजावती प्रचार केला यावेळी महिला युवक आणि अनेक संघटन्यांसोबतच थोरा मोठ्यांनी देखील त्यांना आपला पाठिंबा दर्शविला.