निपाणी कृषी उत्पन्न बाजार समितीला एक इतिहास आहे. पूर्वी याठिकाणी गुळ, मिरची, तंबाखूचे सौदे होत होते. कालांतराने ते बंद झाले. आता या परिसरात विविध उद्योग व्यवसायासाठी गोडाऊन उपलब्ध केली आहे. या परिसरात मिनी विधानसौध उभारण्यासाठी जागेची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात दोन एकर जागा मंजूर झाली आहे. येणाऱ्या दिवसात तीन एकर अधिक जागा मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. या परिसराच्या विकासासाठी आपण नेहमीच पाठबळ दिले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून एपीएमसी परिसरात विकास योजना राबवल्या जाणार आहे, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले.
एपीएमसी परिसरात आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून शासनाच्या नाबार्ड योजनेतून रस्ताडांबरीकरण व गटार कामासाठी ९७.२५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या, निपाणी विधानसभा मतदारसंघात विविध विकास योजना राबवण्यासाठी आपण नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या दिवसात अधिक विकासाला गती दिली जाणार आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून विकासकामे राबवणार आहे, असेसांगितले.यावेळी नागरिक उपस्थित होते.
निपाणीत ९७.२५ लाखाच्या रस्ता कामाचा शुभारंभ
