No menu items!
Friday, March 14, 2025

गांधीनगरमध्ये ॲड. अमर येळ्ळूरकर यांचे जंगी स्वागत

Must read

बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांचा प्रचारार्थ गांधीनगर येथे काल गुरुवारी भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी मार्गावर रांगोळ्या रेखाटून फटाक्यांच्या आतषबाजीत ॲड. येळ्ळूरकर यांचे ठीक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

समिती उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी आपल्या प्रचारफेरीची सुरुवात किल्ला येथील श्री दुर्गा देवीला नतमस्तक होईल केली. गांधीनगर भागातील महिलांनी प्रचार मार्गावर रांगोळ्या घालून सामूहिक ओवाळणी करत ॲड. येळ्ळूरकर यांचे उस्फूर्त स्वागत केले. प्रचार फेरी दरम्यान महिलांनी ॲड. अमर येळ्ळूरकर यांचे प्रचार चिन्ह असलेली ‘घागर’ डोक्यावर घेवून प्रचारात रंगत आणली आहे. गांधीनगर येथील श्री नृसिंह मंदिरात आशीर्वाद घेत संपूर्ण गांधीनगरमध्ये पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काल गुरुवारी गांधीनगरमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा जयघोष बुलंद करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच अतिषबाजी करून ॲड. अमर येळ्ळूरकर यांचे उत्साही स्वागत करून समितीला विजयी करण्याचा निर्धार गांधीनगरवासियांनी व्यक्त केला. यावेळी दुर्गामाता महिला मंडळ, जय हनुमान युवक मंडळ, वीर अर्जुन युवक मंडळ, शिवप्रेम मित्र युवक मंडळ आदी मंडळांच्या महिला व कार्यकर्त्यांनी ॲड. येळ्ळूरकर यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला. ठिकठिकाणी मंडळांच्या फलकांवर समिती उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला होता. यावेळी लक्ष्मी पालकर, शीतल केसरकर, वीणा पाटील, रेश्मा धामणेकर, बाळू तवनोजी, विश्वजित वंटमुरकर, संजय चौगुले, चंद्रकांत कोंडूसकर, प्रशांत डांगे, संतोष धुडूम, नागेश कटारे, निलेश कटारे, बबन सदनेकर, मनोहर मंडोळकर, शिवाजी कालकुंद्रिकर, विशाल अपटेकर, नागेश मंडोळकर , राजू मुतकेकर, रवी निर्मळकर यांच्यासह गांधीनगर भागातील पंच, समितीचे आजी -माजी नगरसेवक, ज्येष्ठ नेते आणि असंख्य नागरिक, महिला व युवक उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!