भारतीय जनता पार्टीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमदेवार डॉ रवी पाटील यांनी आज कॅम्प येथील भावसार क्षत्रिय समाजाच्या मारुती मंदिरात पूजन करून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली .यावेळी त्यांनी स्वच्छता व्यवस्थापनासह कॅम्प परिसराचा सर्वांगीण विकास करून परिसरातील नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले .यावेळी भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी किशोर खोकले , संजय रणसुबे अमूल बेद्रे ,शेष जवळीकर सुधीर तुपेकर सुनील जवळी ,मनोज मिरजेकर उपस्थित होते.
तसेच यावेळी डॉ रवी पाटील यांची पत्नी सौ .सुनीता रवी पाटील यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहरातील कंटेनमेंट बोर्ड स्टाफ क्वार्टरमध्ये प्रचार केला. यावेळी त्यांनी मतदानापासून वंचित राहू नये, अशी विनंती केली आणि राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी ,बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रतिसाद मिळावा यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले
तसेच कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाचे (एन.) बेंगळुरचे डॉ एम .जी .मुरली यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला .यावेळी त्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील अनेक गल्लीतील पंच मंडळाची भेट घेऊन नागरिकांना भाजप कर्नाटक सरकारने मराठा समाजासाठी ग्रामीण आणि शहरी भागात केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी कर्नाटक मराठा समाज विकास मंडळातर्फे शेतकरी, बेरोजगार युवक, महिला कल्याण आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा विविध योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली .यावेळी विनय जी ,ह.भ.पाटील, नागराज कर्पूर आदी उपस्थित होते.
त्यानंतर डॉक्टर रवी पाटील यांनी कपिलेश्वर मंदिर येथून सायंकाळच्या प्रचाराला सुरुवात केली.त्यानंतर त्यांनी तांगडी गल्ली रामा मेस्त्री अड्डा,संभाजी गल्ली तानाजी गल्ली मल्लिकार्जुन नगर समर्थ नगर भांदुर गल्ली पाटील मळा तशिलदार गल्ली दोड्डनावर कॉम्प्लेक्स, फुलबाग गल्ली पहिला दुसरा आणि तिसरा क्रॉस तसेच पाटील गल्ली आणि शनी मंदिर येथे फेरी काढून प्रचार फेरीची सांगता केली.
उद्याचा प्रचार मार्ग
रामलिंग खिंड गल्ली अनसुरकर गल्ली महादेव गल्ली किर्लोस्कर रोड , केळकर बाग मनमाड गल्ली या ठिकाणी सकाळचे सत्रात प्रचार फेरी काढण्यात येणार आहे.
त्यानंतर संध्याकाळी शिवाजीनगर गणपत गल्ली तिसरा क्रॉस शिवाजीनगर चौथा क्रॉस, पाचवा क्रॉस सहावा क्रॉस सातवा क्रॉस शिवाजीनगर पहिली गल्ली पहिला क्रॉस शिवाजीनगर पहिली गल्ली मेन , शिवाजीनगर साईबाबा मंदिर, जोशी कंपाऊंड जेल कॉलनी या ठिकाणी प्रचार करण्यात येणार आहे.