भारतीय जनता पार्टीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी शहराच्या विविध भागात आज प्रचार केला. आज त्यांनी रामलिंग खिंड गल्ली अनसुरकर गल्ली महादेव गल्ली किर्लोस्कर रोड केळकर बाग कोनवाळ गल्ली या ठिकाणी मतदारांच्या गाठी घेऊन प्रचार केला.
त्यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले आणि दहा मे रोजी भाजपलाच मतदान करू अशी ग्वाही दिली. तसेच या भागातून भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे आज प्रचारादरम्यान दिसून आले.