दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा उद्या रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. सदर सुवर्ण महोत्सवी सोहळा गोवावेस येथील रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे दुपारी ४.३० वा. आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन रमेश वामनराव मोदगेकर यांनी दिली आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पणन संचालक व अतिरिक्त आयुक्त (सहकार ) दिनेश ओऊळकर, सहकारी संघाचे संयुक्त निबंधक जी. एम. पाटील, उपनिबंधक एम. एम. मणी, सहाय्यक निबंधक रवींद्र पी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून गडहिंग्लजचे प्रा. डॉ. दत्ता पाटील व प्रा. आनंद मेणसे आदी मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सोसायटीचे व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील यांनी सांगितले आहे.
सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ सभासदांचा, सोसायटीच्या माजी कर्मचाऱ्यांचा, गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय इतर काही कार्यक्रम होणार असल्याची माहिती सर व्यवस्थापक जयवंत लक्ष्मण खन्नूकर यांनी दिली आहे. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन रमेश वामनराव मोदगेकर, व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील यांच्यासह मिलिंद पावशे, मारुतीराव सदावर, कृष्णराव मोदगेकर, यल्लाप्पा चौगुले, उदय किल्लेकर, शिवाजी शहापूरकर, सौ. नंदा बिर्जे, श्रीमती. निर्मला कामुले हे संचालक आणि सर व्यवस्थापक जयवंत खन्नूकर तसेच कर्मचारी व पिकनिक कलेक्टर विशेष परिश्रम घेत आहेत.