श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या श्री दुर्गामाता दौडीचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने अनेक जण दौडीची आतुरतेने वाट पाहत होते. अमाप उत्साहात भल्या पहाटे ठरलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी उद्यान येथे पहाटे पाच वाजल्यापासूनच शिवभक्त जमायला सुरुवात होत होती. अनेक जण फेटे बांधून घेण्याच्या तयारी मध्ये होते जवळपास शेकडो हून अधिक शिवभक्तांनी फेटा बांधण्यासाठी रांगा लावल्या होत्या. आजच्या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती शिवरायांचे विधिवत पूजन करण्यात आले. आजच्या दौडीचे प्रमुख पाहुणे म्हणून छत्रे गुरुजी तसेच त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. त्यांच्या वतीने शिवरायांना हार घालून, ध्वजाच्या काठीला ध्वज चढवण्यात आला. तसेच शस्त्र पूजन करण्यात आले. यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी दौडीला उपस्थित शिवभक्तांना दौडी बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर दौडीला सुरुवात झाली. प्रारंभी हुलबत्ते कॉलनी, शास्त्रीनगरचा संपूर्ण भाग, गुड्शेठ रोड, महाद्वार रोड त्यानंतर समर्थ कॉलनी नगर परत महाद्वार रोड करून एस पी एम रोड मार्गे श्री कपिलेश्वर मंदिर येथे सांगता करण्यात आली. आरती करून ध्येय मंत्र म्हणून, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर यांच्या हस्ते ध्वज उतरवून आजच्या दौडीची सांगता करण्यात आली. दौडीच्या मार्गावर अनेकांनी स्वागत फलक लावले होते. अनेकांनी रस्त्यावर रांगोळी, फुलांची आरास केली होती. अनेक बालचमू पारंपरिक वेशात दौडीच्या स्वागतासाठी उभे होते. हजारोंच्या संख्येने शिवभक्त, धारकरी, बालचमू उपस्थित होते.
उद्याची श्री दुर्गामाता दौड गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल येथून प्रारंभ होऊन दुर्गादेवी मंदिर किल्ला येथे सांगता झाली