No menu items!
Thursday, September 19, 2024

२ ऱ्या इंडिया स्केट गेम्स 2024 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले

Must read

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ओपन नॅशनल २ऱ्या इंडिया स्केट गेम्स स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चे स्केटर्स सहभागी झाले होते.ही स्पर्धा दिनांक ८ ते १५ ऑगस्ट 2024 या कालावधीत पोलाची कोइंबतूर चेंनई येथे पार पडली या ओपन नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुमारें १३ राज्यातून ८०० च्या वर खेळाडूंनी भाग घेतला होता. बेळगांव संघाने ६ रौप्य व २ कांस्य अशी ८ पदके जिंकली.

स्केटिंग पदक विजेताची नावे

हिरेन राज २ रौप्य
जयध्यान एस राज १ कांस्य
साईराज मेंडके १ कांस्य
खुशी घोटिवरेकर १ रौप्य
शेफाली शंकरगौडा १ रौप्य
सई शिंदे १ रौप्य
मुदालसिका मुल्लानी १ रौप्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली केलई स्केटिंग रिंक , गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून ह्या सर्व स्केटरना . डॉ प्रभाकर कोरे माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस के.आर.एस.ए. यांचे प्रो्साहन लाभत आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!